*उष्माघात वाढतोय, काळजी घ्या...* शरीरातील पाणी वाढवा - उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. *उपाय---* ◼️नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. ◼️अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल. ◼️उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल. ◼️उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील. ◼️हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका. ◼️माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही. ◼️पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे. ◼️आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. स...